Supriyadevkar's post
cancel
Showing results for 
Search instead for 
Did you mean: 
Level 9

लोकसंस्कृती उद्यान पाषाण, पुणे

1000089057.jpgपाषाण येथे उभारले गेलेले हे लोक संस्कृती जपणार उद्यान काहीसं दुर्लक्षित असलं तरी महाराष्ट्रातील परंपरा आणि संस्कृतींना दर्शवणारा एक अप्रतिम ठिकाण आहे. येथे जाण्याकरिता तुम्ही पुण्यातील कोणत्याही ठिकाणाहून कॅब करू शकता सोमेश्वर मंदिर हे प्रसिद्ध मंदिर या उद्यानाशेजारीच आहे त्यामुळे सोमेश्वर मंदिर या ठिकाणचा उल्लेख प्रामुख्याने येथे केला आहे.

सर्वप्रथम सोमेश्वर मंदिरात शंकराचे दर्शन घेऊन बाजूच्या पायऱ्या वरती चढत गेल्यावर बारा ज्योतिर्लिंगांच्या मंदिराच्या प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळतात अगदी हुबेहूब अशा या मंदिरांच्या प्रतिकृती तिथे उभारले आहेत.

*या ठिकाणी जायचं झाल्यास किमान दोन ते तीन तासाचा अवधी आपल्याकडे असणे आवश्यक आहे तरच तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे हे उद्यान पाहता येते.

1000088991.jpg

 महाराष्ट्रातील अनेक जाती जमाती ज्या गावोगावी खेडोपाडी आजही आपल्याला पाहायला मिळतात अशा लोकांचं चित्रीकरण इथे केलं गेलं आहे मग त्यामध्ये पहाटेला टाळ वाजवत येणारा आपला वासुदेव असो किंवा अंगावरती फटके मारून घेणारी कडकलक्ष्मी असो बांगड्या भरणारा कासार असो किंवा घाण्या वरचं तेल काढणारा  घाणेकर असो. आजच्या या धकाधकीच्या जीवनात आपल्याला हे सर्व पाहायला मिळत नाही किंबहुना आपल्या मुलांना याचा काहीच गंध नाही तेव्हा आवर्जून अशा ठिकाणी भेट देऊन त्यांना आपल्या समाजात वावरणाऱ्या या सर्व लोकांचा परिचय व्हावा तसेच आपण साजरे करणारे सण आठवडी बाजार यांची सुद्धा मेजवानी येथे उभारली आहे तेव्हा नक्कीच अशा ठिकाणांना भेट देणे आणि आपल्या मुलांना किंबहुना आपल्याला सुद्धा हे सारे जतन करून ठेवता आलं पाहिजे तेव्हा नक्की या ठिकाणास भेट द्यावी.

गावाकडील जुने वाडे ,जनावरांचा गोठा, शाळा पंचायत लग्न समारंभ अशा अनेक गोष्टी इथे तुम्हाला पाहायला मिळतील.

येथे पायऱ्या असल्याकारणाने व्हील चेअर चा वापर करता येत नाही मात्र काही ठिकाणे पाहू शकतात.

🙇‍♀️🙇‍♀️ लहान मुलांना तुम्ही आवर्जून येथे घेऊन जाऊ शकता.

🫙🫙पाण्याची सोय येथे बाहेर उपलब्ध आहे मात्र आत तुम्ही स्वतःच्या पाण्याच्या बाटल्या घेऊन जाऊ शकता.

 

Pune, Maharashtra, India
8 comments
Level 9

Betreff: लोकसंस्कृती उद्यान पाषाण, पुणे

@Supriyadevkar 

Das scheint ein sehr interessanter Ort zu sein um mehr über die Kultur zu erfahren.

Schöne Bilder 

Level 9

Re: लोकसंस्कृती उद्यान पाषाण, पुणे

अरे वाह बघायला पाहिजे, लोक संस्कृती जपणे खूप आवश्यक आहे, पुढच्या पिढीला ह्याची माहिती आणि जाणीव असणे गरजेचे आहे.

 

ही माहिती आमच्याशी शेअर केल्याबद्दल धन्यवाद, @Supriyadevkar.

 

| Ajit Thite | “Collect moments, not things” – Aarti Khurana |
My Latest posts :- | A Photo Challenge of the Roses: Nature's Masterpieces | Unusual, strange siting challenge: I noticed a plane parked next to the highway! ‌ |
Connect Moderator

Re: लोकसंस्कृती उद्यान पाषाण, पुणे

हे उद्यान पुण्यातील माझ्या घराच्या अगदी मागे आहे.

बांधकाम सुरू असताना मी शेवटच्या वेळी येथे भेट दिली होती, परंतु त्यानंतर कधीच नाही.

पुण्यातील हे अतिशय मनोरंजक ठिकाण शेअर केल्याबद्दल धन्यवाद @Supriyadevkar 

 

पिण्याच्या पाण्या बद्दल मी सांगेन की जोडून असलेल्या सोमेश्वर मंदिर मध्ये मोफत पाण्याची सोय आहे.

तसेच या ठिकाणी एकूण ३ म्यूजियम्स आहेत, त्यापैकी २ मोफत आहेत.

 

@ajitthite आपल्या meetups साठी योग्य ठिकाण 👍

 

Level 9

Re: लोकसंस्कृती उद्यान पाषाण, पुणे

धन्यवाद अजित सर.नक्की भेट द्या.सोमेश्वर मंदिर,बारा ज्योतिर्लिंग आणि लोकसंस्कृती एकाच ठिकाणी पहायला मिळते.

Level 8

Re: लोकसंस्कृती उद्यान पाषाण, पुणे

@Supriyadevkar me impresionan los muñecos parecen reales. 

Level 9

Re: लोकसंस्कृती उद्यान पाषाण, पुणे

शांत परिसर आहे मंदिर, प्रतिकृती पहाताना वेळ कुठे कळत नाही.

Level 9

Betreff: लोकसंस्कृती उद्यान पाषाण, पुणे

Thanks dear.

Level 9

Re: लोकसंस्कृती उद्यान पाषाण, पुणे

Yes they look like real.