Praniketmore's post
cancel
Showing results for 
Search instead for 
Did you mean: 
Level 8

कोकणी शिमगा : देवाची पालखी आपल्या घरी येते

कोकणी शिमगा : देवाची पालखी आपल्या घरी येते

 

#1 पालखी मध्ये विराजित असलेल्या ग्रामदैवता आणि भैरोबा पिंड.आणि सजवलेली आरास#1 पालखी मध्ये विराजित असलेल्या ग्रामदैवता आणि भैरोबा पिंड.आणि सजवलेली आरास

 

 

फाल्गुन पौर्णिमेनंतर वसंतोत्सव सुरू होतो, ज्याला वसंतशुत असेही म्हणतात. या ऋतूत होळीच्या रंगामुळे एक वेगळाच सण आहे. होळी हा महाराष्ट्रातील प्रमुख सण आहे. सर्व प्रदेशांमध्ये, एकत्र जमून होळी साजरी करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात. विशेषतः कोकण हा होळी सणासाठी प्रसिद्ध प्रदेशांपैकी एक आहे. कोकणच्या दिशेने जाणाऱ्या सर्व मार्गांवर त्या दिवसात खुप वाहतूक असते. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग पर्यंतचा शिमगा गावकऱ्यांच्या मनाला खूप प्रिय आहे. काही गावकरी कामासाठी शहरात जातात पण शिमग्यासाठी कोकणात परततात.

 

दहन म्हणजे सुकलेल्या झाडाची लाकडे रचून त्याभोवती सुखा गवत लावले जाते, जे गावातून वाईट गोष्टी आणि नकारात्मकतेचे प्रतीक दर्शवते. यावेळी सर्व ग्रामस्थ एकत्र येतात. 

सर्व गावकरी मिळून त्याभोवती रिंगण करुन गावदेवीला साकडे घालत पालखी वरिल विशेष पारंपरीक गीत बोलतात त्या गीतात पालखी कक्षी सजली आणि त्या पालखी मध्ये कोणत्या देवता आहेत त्यावरिल सुंदर कहाणी आहे.नंतर आरोळी देऊं होळी ला अग्नि दिली जाते.नवस असल्यास किंवा नवीन लग्न झालेले लोक होळित नारळ अर्पण करतात ते नारळ नंतर बाहेर काढुन फोडून प्रसाद म्हणून खाल्ला जातो.

 

#2  या छायाचित्रा मध्ये आपण पाहतोय की गावकरी मिळून होलिका उभी करुन सजवत आहेत त्यात झाडाची लाकडे आणि सुखा गावताचा वापर केला जात आहे.#2 या छायाचित्रा मध्ये आपण पाहतोय की गावकरी मिळून होलिका उभी करुन सजवत आहेत त्यात झाडाची लाकडे आणि सुखा गावताचा वापर केला जात आहे.

 

होळी दहनाचा दिवशीच संध्याकाळी गावदेवीची पालखी सजवली जाते सर्व गावकरी तिथे जमा होतात गावात पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार गावातील प्रमुख ४ मानकार्यांच्या हस्ते ती सजवली जाते त्या मानकर्याना खोत म्हंटलं जात. ती त्या होळीला प्रदक्षिणा घालुन जंगलात स्थीत अस्लेल्या गावदेवीचा मंदिरात जाते तीथे गावची दुसरी होळी लागते पाहिली होळी 2:00 चा सुमारास लागते आणि जंगलातली पहाटे 3:30 ला.तिथली प्रथा थोडी अनोखी अहे तिथे होळी सजवताना एक बांबू बांधला जातो त्याच एक टोक होळी मधे आणि एक टोक बाहेर कमानी सद्रुष्य झुकवला जातो त्या टोकाला एक कोंबडीच पिलू बांधला जातो अन मानकर्याने ते बांबू एका घावात तोडण अपेक्षित असत .तोडल्यावर ते पिल्लू ते घेउन त्याच पालन पोषन करतात. 

 त्या रात्री पालखी गावदेवी मंदिरात ठेवतात आणि काहीजण तिथेच झोपतात. दुसऱ्या दिवशी सर्व गावकरी गावदेवी मंदिरात येउन पालखीची ओटी भरतात आपले नवस बोलतात तिथुन पालखी शेजारील गावात जंगलातुन जाते कारण त्या देवी बहीणी आहेत जोपर्यांत आमची पालखी पोहोचत नाही तोपर्यंत तेथील शिमगा सुरू होत नाही .पालखी त्या गावी 2 दिवस असते ते मनोभावे ती नाचवतात त्या 3 पालख्या एकत्र भेटतात त्या 3 बहिणी आहेत तो क्षण अंगावर रोमांच आणतात. 3 दिवसांनी पालखी आमचा मुळ गावी माघारी येते आणि पालखीच स्वागत जंगी होत मग ती गावात मानकर्यांकडे नाचवली जाते आणि मग सर्वांच्या घरी दर्शनाला येते. 

 

#3 या छायाचित्रात आपण पाहतोय होलीका दहन#3 या छायाचित्रात आपण पाहतोय होलीका दहन

 

#4 या छायाचित्रात आपण होलिका दहन पाहत आहोत#4 या छायाचित्रात आपण होलिका दहन पाहत आहोत

 

 

#5 या छायाचित्रात आपण पालखी घरी आणताना पाहत आहोत#5 या छायाचित्रात आपण पालखी घरी आणताना पाहत आहोत

 

#6 या छायाचित्रात आपण पाहतो की 3 पालख्या दिसत आहेत, या 3 वेगवेगळ्या गावच्या आहेत पण 3 बहिणी मानल्या जातात आणि शिमग्याला या तिनही 2 दिवसासाठी एकत्र भेटतात .#6 या छायाचित्रात आपण पाहतो की 3 पालख्या दिसत आहेत, या 3 वेगवेगळ्या गावच्या आहेत पण 3 बहिणी मानल्या जातात आणि शिमग्याला या तिनही 2 दिवसासाठी एकत्र भेटतात .

 

पंचमी ला पालखी आणी शिमगोत्सवाची सांगता होते असा शिमगा कोकणात 7 दिवस चालतो काही कोकणाच्या प्रभागात 15 दिवस चालतो गाव मोठे तर पालखी घरोघरी जाण्यास जास्त दिवस..

नक्किच कोकणातील अशा अनोख्या शिमगा होळीला एकदा भेट द्या.

 

@TravellerG 

@Tushar_Suradkar 

@ajitthite 

@Shrut19 

@ShubhamWaman 

@Gurukrishnapriya 

@RosyKohli 

@abhishekpatk 

 

 

Praniket More || " Having a hobby is sweet for your psychological state – Chanakya " ||

My Insta||My Post Gallery|| Hex sticker design competition winner

Khed, Maharashtra, India
24 comments
Level 8

Re: कोकणी शिमगा : देवाची पालखी आपल्या घरी येते

मस्त रे!! कोकणी शिमगोत्सव संदर्भात सुंदर पद्धतीने माहिती दिल्याबद्दल धन्यवाद @Praniketmore.

छोट्या छोट्या बाबींचा बारकाईने विचार करून लिहिले आहेस. सर्व फोटो उत्तम. पालखी घरी आणताना तुझा फोटो सुद्धा छानच. पुन्हा एकदा धन्यवाद. 

 

Abhishek Patki
Level 10

Re: कोकणी शिमगा : देवाची पालखी आपल्या घरी येते

Ohh...WOW...

How our heritage is connected?

Whatever you have narrated are present in many parts of Kerala also. Of course, we have a common heritage...

Happy to see you carrying the palanquin... excellent that you continue with these heritage festivals even now - and in Kerala, much orthodox rituals are becoming more common and popular!

Holika Dahan photo and video looks great!

Dance with the Palanquin in your video also resembles some in Kerala!

As usual, all the shots have come out well...

Highly appreciate your contribution, dear @Praniketmore 

👌🌹🤝

Oh...sorry... if the Photo is missing, kindly inform meOh...sorry... if the Photo is missing, kindly inform meOh...sorry... if the Photo is missing, kindly inform meOh...sorry... if the Photo is missing, kindly inform meOh...sorry... if the Photo is missing, kindly inform meOh...sorry... if the Photo is missing, kindly inform meOh...sorry... if the Photo is missing, kindly inform meOh...sorry... if the Photo is missing, kindly inform me

Connect Moderator

Re: कोकणी शिमगा : देवाची पालखी आपल्या घरी येते

Completely agree with @abhishekpatk 

You have covered all the details of the कोकणी शिमगा minutely @Praniketmore 👍

Apart from 'Dashavtaar' I had heard about this tradition of Konkan a lot.

And now from your post, I come to know about it very closely. Thanks a bunch, dear 💐 🤝

Level 8

Re: कोकणी शिमगा : देवाची पालखी आपल्या घरी येते

@Praniketmore पोस्ट खूपच सुरेख पद्धतीने लिहिली आहे. खूप छान. सगळे फोटो मस्तच. मराठीत मस्त पोस्ट लिहितोस तू. शिमग्याबद्दल चांगली माहिती मिळाली तुझ्या पोस्ट मधून. त्याबद्दल धन्यवाद.

Photographer & Trekker
#LocalGuideOfIndia

My Insta
My WhatsApp Channel
Level 10

Re: कोकणी शिमगा : देवाची पालखी आपल्या घरी येते

कोकणी शिमगोत्सव: रंग, उल्हास आणि सांस्कृतिक अभिमानाचा मेळा!

@Praniketmore सुंदर आणि साहित्यपूर्ण लेखनासाठी हार्दिक अभिनंदन! आपल्या शब्दांतून कोकणी शिमगोत्सवाची विविधता, सांस्कृतिक समृद्धी आणि आदिवासी वारसा जणू डोळ्यासमोर जिवंत उभा राहतो.

 

होळीचा धुंद रंग, पालखीचा गर्व आणि माणसांची सांस्कृतिक एकता यांचे चित्रण काही चित्रपटांच्या रंगात उतरवले आहे. लेखनातील सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक मूल्ये प्रेरणादायी आहेत. अशा प्रकारे आपल्या सांस्कृतिक परंपरांमध्ये सहभागी होऊन आपण आपला अभिमान व्यक्त करता हे खरोखर कौतुकास्पद आहे. 

.

तुमच्या योगदानाबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन आणि धन्यवाद!

Happy to see India in millionaires club of Top100.  Are you next? See how to feature? 

Enjoy joyous moments of 7th Connect Birthday  Music, Masti-1, Masti-2 & Dosti 

Crucial facts you didn't know about  How Gudhi Padwa is celebrated in India? 

Come join fun quiz to enrich your maps knowledge. Here's how to participate

Do you wish to have a Hassle-Free trip to HAMPI Read the ViTAL TiPs

Photo crazy girls CSMT BMC InstaFoto | IceSpiceNice | Moody Melodiz |

Level 8

Re: कोकणी शिमगा : देवाची पालखी आपल्या घरी येते

Wow, a great post @Praniketmore . For celebrating festivals though  we are far away we come in person and participate in the festivals.  Yes we look forward for joining the festivals. Thanks for sharing about this festival.

 

In Tamilnadu also we celebrate Bhogi festival before Sankranti day. Fire is lit, then only biodegradable things, all old things are put into fire. This implies burn away old and get new. 

Passionate about
#Temple Art & Architecture
#Nature lover
#Save the Trees
#Typewriter Artist

. Happy Guiding.

Level 8

Re: कोकणी शिमगा : देवाची पालखी आपल्या घरी येते

@abhishekpatk  धन्यवाद पोस्ट वाचल्याबद्दल 🙏

तळ कोकणात प्रथा थोडी अजुन निराळी आहे सर्वावर लिहिन नाही साध्य झालं .

Praniket More || " Having a hobby is sweet for your psychological state – Chanakya " ||

My Insta||My Post Gallery|| Hex sticker design competition winner

Level 8

Re: कोकणी शिमगा : देवाची पालखी आपल्या घरी येते

Thank you @TravellerG  sir for your appriciation  and Yes, sir, as far as I am aware, Gaud Sarawat Brahmins (GSB) and Konkani groups. And these communities refer to it as Manjal Kuli or Ukuli. Many of the kerla functions are comparable to the Konkani festival; we may share a coastal area, therefore the tradition is passed down from generation to generation, which may have occurred since we are Sanatani,as similar thing told by @Gurukrishnapriya mam about bhogi festival . And nicely mention this line "This implies burn away old and get new".

Praniket More || " Having a hobby is sweet for your psychological state – Chanakya " ||

My Insta||My Post Gallery|| Hex sticker design competition winner

Level 8

Re: कोकणी शिमगा : देवाची पालखी आपल्या घरी येते

Thank you sir @Tushar_Suradkar  for your appreciation and reading my blogs. Yes, sir, at Talkonkan region, Dashawtaar act plays and they have some various celibration from Rajapur to Sindhudurga Malvan, they have many more traditions.

Praniket More || " Having a hobby is sweet for your psychological state – Chanakya " ||

My Insta||My Post Gallery|| Hex sticker design competition winner