पिझ्झा हे जरी जंक फूड असलं तरी याची मागणी प्रचंड प्रमाणात आहे.व्यायाम करणारे आणि व्यायाम न करणारे देखील पिझ्झा पाहून खाल्ल्याशिवाय राहत नाहीत. पिझ्झा खाल्ल्यानंतर वर्कआउट करून कॅलरी कमी करणारे सुद्धा पिझ्झा खातातच किंवा चिट डे ला पिझ्झा ची मागणी करतात.
पूर्वी पिझ्झा मैदा पासून बनवला जायचा आज ही बनतो मात्र अलीकडे लोक हेल्थ कॉन्शियस झाल्यामुळे बऱ्याच प्रमाणात पिझ्झाचे बेस हे गव्हापासूनही बनवले जातात.
पिझ्झा मध्ये किती प्रकार आहेत हे मी सांगू शकणार नाही मात्र पिझ्झा व्हेज आणि नॉनव्हेज या दोन्ही प्रकारात खायला मजा येते.
![1000280086|690x388]अनेक ठिकाणी ब्रेड पिझ्झा हा ऑप्शन मिळतो ज्यामुळे दुधाची तहान ताकावर भागवली जाते.अगदी पिझ्झा प्रमाणेच टाॅपिंग वापरून चिज चा भडिमार करत ब्रेड पासून मिनी पिझ्झा बनवला जातो.upload://8J57KAf218fiGSevbpr1EDOdJNn.jpeg)
मला पिझ्झा हट मधील पॅन पिझ्झा हा प्रकार आवडतो गरमागरम पॅन मधील पिझ्झा तुम्हाला पानात वाढला जातो.सोबत साॅस,हर्ब ,चिली फ्लेक्स ची पाकीट पुरवली जातात .यात चिज तर असते मात्र त्याचा अतिरेक नसतो.
मला तंदुरी पनीर पिझ्झा, चिकन पिझ्झा हे प्रकार आवडतात.
कोल्हापूर येथे व्हेज पिझ्झा खायचा असेल तर हेवन पिझ्झा या ठिकाणी भेट द्या वी लागते
पूर्ण व्हेज पदार्थ या ठिकाणी उपलब्ध होतात.
सर्व व्हेज टाॅपिंग वापरून मस्त पिझ्झा तयार करण्यात येतो या ठिकाणी पिझ्झा पार्टी रुम उपलब्ध आहे.
तर नाॅनव्हेज साठी मी पिझ्झा हटची दिवाणी आहे.
या ठिकाणी अतिशय उत्तम रित्या बनवले गेलेले पिझ्झा पानात वाढले जातात.
तुम्हाला कोणत्या ठिकाणीचा पिझ्झा आवडतो आणि तो व्हेज कि नाॅनव्हेज आहे हे देखील कळवा सोबत फोटो ही टाकला तर उत्तम.