आपल्या घरात आई ही अशी व्यक्ती असते जी कोणतेही पदार्थ वाया जाऊ नये या करता प्रयत्न करत असते.तसच माझ आई मन देखील या गोष्टी खूप पाळत.आज खूप अंजिर घरात होते आणि त्या पासून ही चटणी बनवणं अगदी सोपे काम.
अंजीर हे फळ थंडीच्या दिवसात मोठ्या प्रमाणावर खायला मिळते. हे फळ अतिशय गोड नसते मात्र पुरेसा गोडवा या फळांमध्ये असतो. बऱ्याच लोकांना हे फळ आवडत नाही पण या फळापासून बनणारी चटणी मात्र अतिशय टेस्टी बनते. खूप झटपट बनणारी अशी ही रेसिपी आहे. कधी घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपण जर हे फळ आणली असतील तर अशी चटणी बनवून ठेवली तर ती खूप आवडीने लोक खातात आणि फळ खराब होण्याची भीती राहत नाही.
चला तर मग याची रेसिपी पाहूया.
साहित्य:-
चार ताजे अंजीर
एक बारीक चिरलेला कांदा
एक टेबल स्पून लाल तिखट
एक टेबल स्पून गूळ किंवा साखर
अर्धा टीस्पून मीठ
अर्धा टीस्पून गरम मसाला
कृती
१.सर्वप्रथम अंजीर स्वच्छ धुऊन त्याचे बारीक काप करून घ्यायचे सोबतच कांदाही बारीक चिरून घ्यायचा.
२. त्यानंतर कढईमध्ये एक टेबलस्पून तेल गरम करून त्यामध्ये मोहरी आणि जिरे यांची फोडणी तयार करायची आता त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून हा कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा भाजून झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेला अंजीर घालायचा.
३. आता त्यामध्ये लाल तिखट, गरम मसाला , गुळ किंवा साखरआणि मीठ घालून घ्यावे.
४. मीठ आणि साखरेमुळे या मिश्रणाला पाणी सुटेल हे पाणी आटेपर्यंत हे मिश्रण मधून मधून हलवत राहावे यामुळे ते छान घट्ट होते तसेच हलवताना त्याला स्मॅशही करावे.
५. हळूहळू याचा गोळा बनायला सुरुवात होते अशावेळी गॅस बंद करावा आणि आपली चटणी तयार होते.
६. रोजच्या जेवणामध्ये ही चटणी तुम्ही खायला घेऊ शकता.
मोठ्या प्रमाणात बनवली असेल तर ती फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता.
Thank you for sharing these fig pickle recipes and images @Supriyadevkar . I have a doubt, is the fig good for putting inside water and salt for fermenting to make pickle. I am gonna tag @TusharSuradkar as he is fond of figs.
छान @Supriyadevkar
The Ajeer Chatani looks yummy @Supriyadevkar
@Rahul001 I think it needs to be consumed quickly since it is not a pickle.
This is chatani, different from the pickle, and must be consumed the same day or the next.
Yummi a lotof
मी कधी ऐकली बुवा अंजिराची चटणी आपण दिसतेय एकदम मस्त आणि चमचमीत .
आमच्याशी शेअर केल्याबद्दल धन्यवाद .
Rahul this is not a pickle.this is chutney which is prepared without using water.
करून पहा नक्कीच आवडेल
It’s really yummy and tasty.
Yes chutney you can store in refrigerator for two days. As we can not prepare at big amount.
Thanks rushikesh
Amazing post @Supriyadevkar ji, thanks for sharing the recipe