mohanghyar's post
cancel
Showing results for 
Search instead for 
Did you mean: 
Level 8

RECAP Of Marathi Meet Up-02 | सविस्तर वृत्तांत - मराठी भाषिकांचे चर्चासत्र -०२

नमस्कार,
प्रिय स्थानिक मार्गदर्शक समुदाय,
मी कृतज्ञतापूर्वक जाहीर करू इच्छितो कि मी आणि एलजी @Tushar_Suradkar  (सह-होस्ट) यांच्या सोबत मराठी मीट अप-०२ यशस्वीरित्या पार पाडली.



मराठी भाषिकांच्या चर्चासत्र ०२ मध्ये 
०१. @Tushar_Suradakar  तर्फे कनेक्ट वर कश्या प्रकारे मराठीचा वापर  
आणि 
०२. माझ्या तर्फे नकाशावर रोड कसे संपादित करावे यासाठी 
असे आम्ही एकत्र येण्याचे ठरविले. 
 
मला असे वाटते की आम्हाला खरोखर ज्ञान सामायिकरण व्यासपीठाची आवश्यकता आहे म्हणून आपल्यातील काहींनी एकत्र येऊन यासाठी संमेलनाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला होता. या चर्चा सत्राची तयारी करताना खूप काही नवीन शिकायला मिळाले. महत्वाची गोष्ट म्हणजे कोणाला अडचण आली तर निस्वार्थ पणे मदत करणारे माझे सर्व लोकल मार्गदर्शक  सहकाऱ्यानी मुळे एखादी मीटअप होस्ट करणे काय असतं आणि त्याची पूर्व तयारी कशी करावी हा सर्व अनुभव मिळाला आणि बऱ्याच मित्रांची साथ पण मिळाली. 
 
सुरुवात झाली ती मीटअप चे बॅनर कसे तयार करावे ??
 
बॅनर तयार करायला हाती घेतला पण मला त्यात खूप अडचणी आल्या पण म्हणतात ना "a friend in need is a friend indeed" असेच काही घडले माझ्या सोबत आणि सर्व मित्र धावून आले व काय छान बॅनर तयार झाला. हि तर माझ्यासाठी एक प्रेरणाच होती, बॅनर पाहूनच मीटिंग बद्दल काय लिहावे असा विचार करता करता मी ते लिहले व अश्या प्रकारे एप्लीकेशन मॅटर तयार झाले. 
चर्चासत्राची माहित नव्हती अडथळे खूप आले पण ते नाहीसे होत गेले फक्त माझे LG मित्रानं मुळे.  
मीटिंग ची वेळ जवळ येत असतांनाच तर त्याच दिवशी सकाळी उठून घरातील कामे आटपून घेतली आणि मीटअपची तयारी करायला बसणारच तोच पावसाचा जोर वाढला वडिलांनी कॉल करून मला शेतात बोलावले कि सर्व पिक पाण्यात आहे तू लवकर ये मी तसाच उठून शेतात गेलो आणि बराच वेळ माझा शेतात गेला. शेवटी ते काम  झाले पण काय मीटअपची तयारी अधुरीच राहीली, तरी ही घरी मी थोडा वेळ मीटअप व तयारीसाठी काढला. पण म्हणतात ना काही चांगल्या कामात अडथळा येतो. तो अडथळा होता विजेचा. आता त्यातही वीज गेली होती . हा प्रश्न निर्माण झाला काय करावे काही सुचेना मोबाईल बॅटरी चार्जे कशी तरी पूर्ण चार्ज झाली. 
वेळ आली माझ्या मीटअप ची.  
हो आणखीन एक अडथळा म्हणजे माझ्या कडे कॉम्पुटर नाही पण मग मला मदत मिळाली ती LG मित्रांची त्यांनी मला कॉम्पुटर साठी आवश्यक ते बाबी घेऊन स्वतः ती जिम्मेदारी उचलली. 
आभार आहेत त्यांचे सर्वांचे ज्यांनी मला हि मीटअप बद्दल सर्व प्रकारची मदत केली.  
 
मिटिंगचा शेवट आमचे सहकारी LG @ModNomad  Deepak Modgekar  सर यांनी शोले चित्रपटातील  "ये दोस्ती हम नहीं छोडेंगे" या गाण्याचे माऊथ ऑर्गनचा वापर करून उत्तम असे सादरीकरण करून मिटिंग चा शेवट गोडच केला.
 मराठी मीट अप -०२ मध्ये सहभागी झालेले सहकारीमराठी मीट अप -०२ मध्ये सहभागी झालेले सहकारी
गुगल मॅप व कॅनेक्ट वर सक्रिय असणारे वरिष्ठ एलजी @C_T यांच्याकडून मार्गदर्शन साठी उपस्थिती मिळविणे हे एक भाग्यच आहे,
 
रिकॅप वाचून प्रतिक्रिया नोंदवावी अशी मी मोहन व सह-होस्ट Tushar Suradakar विनंती करतो सोबत तुमचे आभार मानतो. 
मीट अप दरम्यानचे काही स्क्रीन शॉट खाली दिलेल्या लिंक मध्ये जोडले आहेत. 

धन्यवाद.
@Shrut19  ताई @Rohan10 दादा @ajitthite दादा @MayuriKubal  ताई @Shreeya_99  ताई @Globe_trotter_Ish  ताई आणि इतर सर्व सहकारी !!
Akola, Maharashtra, India
22 comments
Level 10

Re: RECAP Of Marathi Meet Up-02 | सविस्तर वृत्तांत - मराठी भाषिकांचे चर्चासत्र -०२

नमस्कार 🙏

@mohanghyar 

सर्व अडचणींवर मात करून

पहिले मीट अप यशस्वी केल्या बद्दल तुझे मनःपूर्वक अभिनंदन..

तु शेतकरी परीवारातील आहे हे आज तुझ्या रिकॅप मुळे कळले, तुझ्यातल्या शेतकऱ्याला माझा साष्टांग दंडवत ..

@Tushar_Suradkar दादा सह होस्टिंग अगदी नेहमी प्रमाणे छान झाली म्हणून अभिनंदन ..

@ajitthite @Rohan10 तुमच्या सहकार्यातून दुसरे हि मराठी मीटअप यशस्वी झाले..

आपल्या सर्व मराठी लोकल गाईड कुटुंबाचा प्रयत्न व @C_T यांचे अमुल्य मार्गदर्शन यामुळे आपण असे अनेक मिटअप पार पाडू अशी मला खात्री आहे..

Level 8

Re: RECAP Of Marathi Meet Up-02 | सविस्तर वृत्तांत - मराठी भाषिकांचे चर्चासत्र -०२

अरे वाह @mohanghyar  खूप छान रिकॅप लिहिला आहेस. आणि मीट अप पण खूप मस्त झाली. रस्ते जोडणी बाबतीत चांगली माहिती दिलीस. मीट अप मध्ये चर्चा हि छान झाली तसेच सर्वांनी चर्चेमधे सहभाग पण घेतला. तुझी पहिली मराठी मीट अप यशस्वी झाल्याबद्दल तुझी खूप खूप अभिनंदन. तसेच @Tushar_Suradkar चे सुद्धा आभार...

Photographer & Trekker
#LocalGuideOfIndia

My Insta
My WhatsApp Channel
Level 10
Level 10

Re: RECAP Of Marathi Meet Up-02 | सविस्तर वृत्तांत - मराठी भाषिकांचे चर्चासत्र -०२

@mohanghyar 

उत्कृष्ट रिकॅप

आणि तो पण मराठीतून हे नक्कीच कौतुकास्पद आहे.

सर्व अडचणी पार करून तुम्ही मीट अप चे होस्टिंग केले हे उल्लेखनीय आहे.

 

Level 7

Re: RECAP Of Marathi Meet Up-02 | सविस्तर वृत्तांत - मराठी भाषिकांचे चर्चासत्र -०२

नमस्कार @mohanghyar 

सर्व प्रथम यशस्वी मीट अप बद्दल अभिनंदन. खरंच मीट अप सर्व अडचणींवर मात करून खूप छान निभावून नेली तुम्ही आणि सर्व सहकाऱ्यांनी 😍😍 सर्वांचे मिळालेले मार्गदर्शन आणि तुम्ही शिकवलेली रस्ते जोडणीची पद्धत अतिशय उपयोगी ठरेल. असे म्हणतात "शेवट गोड तर सारेच गोड" @ModNomad यांनी तर बहार आणली 🤩🤩 छान रिकॅप 🤩🤩🤩

Lots of love and best wishes
Mayuri Kubal
#LocalGuideOfMaharashtra
#IndiaLocalGuide

Check my latest post here  5 Years of Local Guiding and many more to come!!! 


Connect Moderator

Re: RECAP Of Marathi Meet Up-02 | सविस्तर वृत्तांत - मराठी भाषिकांचे चर्चासत्र -०२

अतिशय उत्कृष्ट रिकॅप लिहिला आहेस @mohanghyar 

तुझ्या सोबत मीटप आयोजित करून खरोखर फार आनंद वाटला.

 

तुझी तयारी छान झाली होती आणि रस्ते जोडणीचा अतिशय अवघड डेमो देखील उत्तम झाला.

तुझे या बाबतचे ज्ञान सखोल आहे आणी ते तू सहज सोप्या पद्धतीने मांडलेस.

    

तसेच आपण सर्वानी मिळून अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवली यात या मीटपचे यश सामावले आहे.

@C_T  सरांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले ही आपल्या सर्वांसाठी पर्वणीच.

यापुढे देखील महत्वाच्या विषयांवर सीके सरांच्या चौफेर माहिती खजिन्याची सर्वानी लूट करून घ्यावी ही  अपेक्षा आहे 😊

  

सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या सर्वांच्या आवडत्या @ajitthite दादाने एकहाती तुझे मिटप आपल्या कॉम्पुटर वरून होस्ट केले याचे विशेष कौतुक आणि मी वैयक्तिकरित्या अजितचे आभार मानतो. 

  

इतरांचा सर्वाधिक विचार करणारी @Shrut19 ताई हे आपले प्रेरणास्थान - तुझे आभार आणि कौतुक कितीही करावे, कमीच ठरेल.

 

@MayuriKubal - पुढील मीटप साठी पुढाकार घेतलास याचे आपल्या ग्रुपला औत्सुक्य आहे. यावर लवकरच तुझ्याकडून काही माहिती मिळेल अशी अशा करूया.

Level 8

Re: RECAP Of Marathi Meet Up-02 | सविस्तर वृत्तांत - मराठी भाषिकांचे चर्चासत्र -०२

खुप सुंदर recap @mohanghyar  दादा. 

 

#TEAMINDIA
#TEAMMAHARASHTRA
Level 9

Re: RECAP Of Marathi Meet Up-02 | सविस्तर वृत्तांत - मराठी भाषिकांचे चर्चासत्र -०२

@mohanghyar 

Congrats for successful meet up, thanks for the recap, I never did map editing you had explained in so easy & simple way thanks. Waiting to attend such more meet up. Your this poster slide is awesome. 

@Shrut19 Thanks for letting me know about the marathi meet up. 

@ModNomad you were awesome. 

Connect Moderator

Re: RECAP Of Marathi Meet Up-02 | सविस्तर वृत्तांत - मराठी भाषिकांचे चर्चासत्र -०२

खूप छान रिकॅप लिहिला आहे @mohanghyar ! तुझी पहिली मराठी मीट अप यशस्वी झाल्याबद्दल तुझी खूप खूप अभिनंदन.रस्ते जोडणी बाबतीत चांगली माहिती दिलीस आणि मीट अप मध्ये चर्चा हि छान झाली. अभिनंदन !

Thanks ! In case you wish to reach out, kindly send a private message on Connect. Feel free to tag on interesting posts by adding  '@' before my Connect profile id : globe_trotter_ish and I will respond as soon as I can !


 


Connect Moderator |  Guiding Star 2020 |  Guiding Star 2022Meet-up ChampionAccessibility Champion


Read Accessibility awareness posts here  | Accessible life - Google Earth projectInclusion and diversity series  | #GoGreenWithMaps series


My Instagram profile 

Level 9

Re: RECAP Of Marathi Meet Up-02 | सविस्तर वृत्तांत - मराठी भाषिकांचे चर्चासत्र -०२

@mohanghyar मित्रा,

खूपच छान लिहिला आहेस वृतान्त! मजा आली, तू खुप सोप्या भाषेत सांगितले त्यामुळे खूप सहज लक्ष्यात आले. सगळे जण आवर्जून आले त्याचाही खूप आनंद झाला. ही भरारी अशीच राहू दे हि आशा करतो. सर्व सदस्यांनी भाग घेऊन मीटिंगला रंगत आणली, @MayuriKubal ने सांगितलेली व्हॉइस टायपिंग चे तंत्र सर्वांना उपयोगी पडायला लागले.@Shreeish चे न संपणारे प्रश्न 😃आपण सर्वांनी मिळून त्याला दिलेली उत्तरे हे सर्व मिटिंग साठी अतिशय उपयुक्त वातावरण निर्मिती करणारे होते.  ,@RosyKohli मॅम ने मीटिंगला आल्याचा आनंद पण झाला. @Rohan10 @Tushar_Suradkar  @C_T सर @Shrut19 ताईंनी हा एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे त्याचा मी एक भाग होऊ शकतोय त्याचा मला खूप आनंद आहे. @DBMSysFoto शेवटी शोले च्या  ट्यून ने "चार चांद" लावले.

 

 

परत एकदा अभिनंदन!!

 

 

 

| Ajit Thite | “Collect moments, not things” – Aarti Khurana |
My Latest posts :- | Great Place to pause for Some Moments to Live: Ka'Soul Cafe, Pune |